भाजपला मदत भोवली, सुरेश धस राष्ट्रवादीतून निलंबित

भाजपला मदत भोवली, सुरेश धस राष्ट्रवादीतून निलंबित

सुरेश धस यांनी ऐनवेळी भाजपला मदत केल्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला.

  • Share this:

07 एप्रिल : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित केलंय. पक्षविरोधी कारवाया केल्याचा धस यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. सर्वात जास्त सदस्य निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास पंकजा मुंडेंनी हिरावून नेला.

सुरेश धस यांनी ऐनवेळी भाजपला मदत केल्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्यामुळेच भाजपला मदत करणारे धस यांची पक्षातून अखेर निलंबित  करण्यात आलंय. धस यांची पक्षातून एकाप्रकारे हकालपट्टी झाल्यामुळे त्यांच्यासाठी भाजपचे दार मोकळे झाल्याची चर्चा आता सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 07:13 PM IST

ताज्या बातम्या