01 डिसेंबर: राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यवतमाळ ते नागपूर अशा 155 किमीच्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेला सुरूवात झाली आहे.
राष्ट्रवादीचे सर्व पहिल्या फळीतील नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. भाजप-शिवसेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. यवतमाळ येथील सभेपासून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रीया सुळे या पहिल्या फळीतील सर्व नेते या आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
1 डिसेंबर पासून सुरवात झालेली ही हल्लाबोल पदयात्रा तब्बल 12 दिवस चालून नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे. या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शेतकर्यांशी संवाद साधणार असून कर्जमाफीविषयीच्या समस्या जाणून घेणार आहेत. या पदयात्रेत 15 हजार कार्यकर्ते सहभागी होण्याचा दावा राष्ट्रवादीने केला असून अनेक शेतकरी देखील यात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा