'VIDEO 'डान्सबार'वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील'

'बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांनी मध्यस्ती केली.'

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 03:35 PM IST

'VIDEO 'डान्सबार'वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील'

मुंबई 17 जानेवारी : डान्सबारवरची बंदी उठवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डील झालं असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या बैठकीत मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली. बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांनी मध्यस्ती केली असा आरोपही मलिक यांनी केला.


हे साटं लोटं असल्यानेच राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही असा आरोपही त्यांनी केला. आघाडी सरकार आलं तर राज्यात पुन्हा डान्सबार बंदी घालू असंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्य सरकारने ठाम भूमिका मांडली नाही त्यामुळेच डान्स बार सुरू करण्याचा निर्णय झाला अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारने कोर्टात योग्य भूमिका मांडली नाही असा आरोप केला.

Loading...


राज्य सरकार दाखल करणार पुनर्विचार याचिका


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना राज्य सरकारनं घातलेल्या अनेक जाचक अटी रद्द केल्या आहेत. असं असलं तरी राज्य सरकार डान्स बार सुरू करण्यासंदर्भात फारसं अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कोर्टानं सरकारच्या बहुतेक अटी व्यवहार्य नसल्याचं सांगत रद्द केल्या. डान्सबारमध्ये दारू वाटण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसंदर्भात दिलेला निर्णय हा संमिश्र स्वरूपाचा आहे.


तथापि डान्सबारसंदर्भातील राज्यातील जनतेच्या भावना प्रतिकूल आहेत. त्यामुळे त्या भावनांचे प्रतिबिंब या निकालात नाही. या निकालाच्या अधीन राहत आणि सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखत डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही, असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यक्त केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...