'शिवेंद्रराजे आता भाजपमध्ये आले आहेत', नेत्याच्या दाव्यावर राजे म्हणतात...

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 01:13 PM IST

'शिवेंद्रराजे आता भाजपमध्ये आले आहेत', नेत्याच्या दाव्यावर राजे म्हणतात...

सातारा, 14 जुलै : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी दिल्यानंतर शिवेंद्रराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाने त्यांची समजूत काढली.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच आता भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवेंद्रराजे भाजपसोबतच असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवेंद्रराजे खरंच भाजपच्या जवळ गेले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती. पण शिवेंद्रराजेंनीच याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. याबाबत सरकारनामाने वृत्त दिलं आहे.

शिवेंद्रराजेंकडून नाराजी

'आता भाजप प्रवेश असा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरत असेल तर ते बरोबर नाही,' अशा शब्दांत आमदार शिवेंद्रराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं दिसत आहे.

शिवेंद्रराजेंची नाराजी आणि राष्ट्रवादी

Loading...

खासदार उदयनराजे यांचे साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांबरोबर सतत खटके उडत असतात. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलुनही दाखवली आहे. पण उदयनराजेंची मतदारांवरील पकड पाहता शरद पवार यांनी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे तिकीट दिलं होतं. त्यानंतर उदयनराजे यंदाही निवडून आले. पण या नेत्यांमधील मतभेद काही थांबण्याचं नाव घेत नाहीत, असंच दिसत आहे.

VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...