S M L

वंचित बहुजन आघाडीला हव्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या जागा, इतक्या जागांची केली मागणी

माढा, बारामती आणि नांदेडची जागा प्रकाश आंबेडकरांकडून मागण्यात आली म्हणजे ते युती करण्यासाठी तयार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Updated On: Mar 5, 2019 08:09 PM IST

वंचित बहुजन आघाडीला हव्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या जागा, इतक्या जागांची केली मागणी

मुंबई, 05 मार्च : लोकसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे. नांदेड, बारामती आणि माढा या जागांची मागणी काँग्रेस-राष्ट्रावादीकडे करण्यात आली आहे. यात माढामधून शरद पवार तर बारामतीतून सुप्रिया सुळे या उभ्या राहणार आहेत. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या ही मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी मान्य करणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

माढा, बारामती आणि नांदेडची जागा प्रकाश आंबेडकरांकडून मागण्यात आली म्हणजे ते युती करण्यासाठी तयार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. बरोबर येण्यासाठी आम्ही आंबेडकरांना विंनती करू असंही आव्हाड म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे. आमची मनापासून इच्छा आहे की आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. मोदी लाटेत बारामती, माढा, नांदेड जागा निवडून आल्या तर काय निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी लवकरच ठरवतील असंही आव्हाड म्हणाले.


तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडी बरोबर बैठक झाली. यासाठी अशोक चव्हाण, विखे पाटील, जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन आघाडीकडून लक्ष्मण माने आणि इतर सदस्य उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने २२ जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने 22 जागावर उमेदवार घोषित केले. त्या 22 जागांची मागणी चक्क वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे केली असं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी दिलं आहे.

तर वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर विचार केला तर आम्हास काँग्रेस एनसीपी पक्षाला ११ जागा येतात, याबाबत पक्ष श्रेष्ठी विचार करतील असं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2019 08:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close