पवार Vs फडणवीस, फोडाफोडीच्या राजकारणानंतर एकाच मंचावर रंगणार जुगलबंदी

पवार Vs फडणवीस, फोडाफोडीच्या राजकारणानंतर एकाच मंचावर रंगणार जुगलबंदी

पक्षांतराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : फोडाफोडीच्या राजकीय खेळीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाधा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज (30 जुलै)हे दोन दिग्गज एकत्र येणार आहेत.

पक्षांतराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाही पवारांच्या टीकेला उत्तर दिलं. त्यामुळे आज होणाऱ्या कार्यक्रमात या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

राज्यभरात सुरू असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची गळती थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसचा एक आमदार उद्या 31 जुलै (बुधवार)भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, आमदार वैभव पिचड आणि काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची पुण्यातील निवास्थानी भेटही घेतली होती. पण त्यानंतर शिवेंद्रराजेंचा भाजपप्रवेश रोखण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचं दिसत आहे. कारण बुधवारी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

VIDEO: मुंबईकरांनो वेळीच घरी पोहोचा, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 10:17 AM IST

ताज्या बातम्या