News18 Lokmat

Lok Sabha Election 2019 : पार्थ मावळमधून उमेदवार; NCPची दुसरी यादी जाहीर

मावळमधून अखेर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 03:48 PM IST

Lok Sabha Election 2019 : पार्थ मावळमधून उमेदवार; NCPची दुसरी यादी जाहीर

मुंबई, 15 मार्च : गुरूवारी लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमोल कोल्हे - शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, बजरंग सोनवणे- बीड, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी काँग्रेसशी बोलणी सुरू असून काही मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व उमदवार जाहीर करू अशी माहिती देखील दिली.

पवारांची घाबरून माघार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपनं हा आपला विजय असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. यावर बोलताना शरद पवार यांनी भाजप-सेनेला घाबरून नाही तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यापूर्वी त्यांनी भाजपचा पराभव केला आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टिका केली.

राष्ट्रवादीची पहिली यादी

Loading...

- बारामती- सुप्रिया सुळे

- सातारा- उदयनराजे भोसले

-ठाणे- आनंद परांजपे

-जळगाव- गुलाबराव देवकर

-बुलढाणा- राजेंद्र शिंगणे

-परभणी- राजेश विटेकर

- उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील

-कल्याण- बाबाजी पाटील

-कोल्हापूर- धनंजय महाडिक

-लक्षद्विप- मोहम्मद फैझल

हातकणंगलेची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.


उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...