रोहित यांची 'शरद पवार स्टाईल', 'या' शब्दांत केली नेत्यांवर जहरी टीका

राष्ट्रवादी सोडणाऱ्या या नेत्यांवर पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

सागर कुलकर्णी सागर कुलकर्णी | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 01:02 PM IST

रोहित यांची 'शरद पवार स्टाईल', 'या' शब्दांत केली नेत्यांवर जहरी टीका

मुंबई, 27 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी सोडणाऱ्या या नेत्यांवर पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षात बदल करताना नेहमी भाकरी फिरवणे या शब्दाचा वापर करत असतात. आता शरद पवार यांचे नातू रोहित यांनीही पवारांच्याच शैलीत नेत्यांवर निशाणा साधला आहे. 'एखाद्या व्यक्तीच्या सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं,' अशा शब्दांत रोहित पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.

रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट

'संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.'

अजित पवारांचं प्रकाश आंबेडकरांना थेट आग्रहाचं आवाहन, पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...