अमोल कोल्हेंसाठी आता शरद पवारही मैदानात, आढळरावांना धक्का देणार?

शरद पवार हे शिवसेना-भाजप या युतीच्या नेत्यांचा समाचार घेतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही राष्ट्रवादीकडून लक्ष्य करण्यात येईल.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 12:16 PM IST

अमोल कोल्हेंसाठी आता शरद पवारही मैदानात, आढळरावांना धक्का देणार?

पुणे, 17 मार्च : शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पहिल्याच कार्यकर्त्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अमोल कोल्हे यांच्या प्रचारसाठी पुण्यातील चाकणमध्ये होणाऱ्या या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सभेत शरद पवार हे शिवसेना-भाजप या युतीच्या नेत्यांचा समाचार घेतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही राष्ट्रवादीकडून लक्ष्य करण्यात येईल.

दरम्यान, राष्ट्रवादीची दुसरी यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली. यात शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून तिथे शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात लढाई होणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे नवीन असलेले अमोल कोल्हे यांना तिथे शिवाजीरावांचं तगडं आव्हान पेलावं लागणार आहे.

मालिकांपासून दूर राहणार

Loading...

हातावरील शिवबंधन तोडून घड्याळ बांधल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेत आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा नाशिकच्या मालेगावात केली.


पार्थच्या उमेदवारीविषयी काय वाटतंय मतदारांना? थेट मावळहून GROUND REPORT


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...