News18 Lokmat

राष्ट्रवादीची हल्लाबोल पदयात्रा वर्ध्याकडे रवाना

या यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी अजित पवारांप्रमाणेच खासदार सुप्रिया सुळेही पदयात्रेतून लोकांशी संवाद साधत होत्या. कळंबमधील काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2017 05:28 PM IST

राष्ट्रवादीची हल्लाबोल पदयात्रा वर्ध्याकडे रवाना

यवतमाळ 03 डिसेंबर:  राष्ट्रवादीची हल्लाबोल पदयात्रा आज यवतमाळमधून वर्ध्याकडे रवाना झाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कळंबमधील चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊन यात्रेला सुरूवात केली. या यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी अजित पवारांप्रमाणेच खासदार सुप्रिया सुळेही पदयात्रेतून लोकांशी संवाद साधत होत्या. कळंबमधील काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे संगीता काळे या शेतकरी विधवेने सरकारबद्दलची नाराजी सुप्रिया सुळेंशी बोलताना व्यक्त केली. त्यावेळी अजित पवारांनी स्वतः यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून संगीता यांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तसंच दूरवरून डोक्यावर पाण्याचा हंडा आणणाऱ्या महिलांनी आपली व्यथा अजित पवारांसमोर मांडली.

शुक्रवारी राष्ट्रवादीची पदयात्रा सुरू झाली.जीएसटी ,शेतकऱ्यांना हमीभाव नाही ,कर्जमाफी नाही अशा अनेक मुद्द्यांवर हल्लाबोल करण्यासाठी हे आंदोलन सुरू झालं आहे.  याआधी राज्यातील रस्त्यांची परिस्थिती दाखवण्यासाठी  सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुप्रियाताई सुळेंनी केलं होतं. सराकारविरूद्ध अनेक आंदोलन सध्या राष्ट्रवादी अत्यंत सक्रीयपणे करते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...