राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात, सभा घेऊन शरद पवार सरकारवर करणार हल्लाबोल

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात, सभा घेऊन शरद पवार सरकारवर करणार हल्लाबोल

या भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, म्हणून परिवर्तन होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, रायगड, 10 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेत आज सकाळी यात्रेला सुरूवात झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पावर यांच्या उपस्थितीत महाडमधील चवदार तळे इथं जाहीर सभादेखील होणार आहे.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा हा पहिला टप्पा असून रायगड, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. या सभांमधून राष्ट्रवादी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. केंद्रातील राफेल प्रकरण आणि राज्यातील दुष्काळाची स्थिती या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते सरकारला धारेवर धरतील.

'लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला म्हणून परिवर्तन गरजेचं'

या भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, म्हणून परिवर्तन होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे , सुनील तटकरे यासांरखे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

शरद पवार आणि राहुल गांधींची भेट

Loading...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीकडे एक पाऊल पुढे पडले आहे. 8 जागांवर सुरू असलेली रस्सीखेच तुर्तास संपली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत 5 जागांवरचा तिढा सुटला आहे. परंतु, 3 जागांचा तिढा कायम असून यात पुण्यातील महत्त्वाच्या जागेचा समावेश आहे.

शरद पवार आणि राहुल गांधी यांची बुधवारी राजधानी दिल्लीत भेट झाली. राहुल गांधी हे पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी गेले होते. त्याच्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मर्लिकार्जुन खरगे सोबत होते. या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागावाटपावर चर्चा झाली. महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. फक्त आठ जागांचा पेच बाकी होतो. त्यावर देखील आता तोडगा निघाला आहे.

पाच जागांवर तोडगा निघाला असून 3 जागांचा निर्णय बाकी आहे. या 5 जागांमध्ये जालना, औरंगाबाद, भिंवडी, अहमदगरचा समावेश आहे. परंतु, 3 जागांवर अजूनही बोलणी सुरू आहे. यात पुण्यातील एक महत्त्वाची जागा आहे. सोबत घटकपक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. परंतु, या जागा कुणाला किती मिळाल्या आहेत, याबद्दल अजून कळू शकले नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनही नेत्यांची झालेली ही पहिलीच बैठक आहे. या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाली. शरद पवार तिसरी आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे.


VIDEO : युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा -उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...