"वो मंदिर नही सरकार बनाना चाहते है, इस देश मे कितने मूर्ख है एक बार फिर अजमाना चाहते है"

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपवर गंभीर आरोप

  • Share this:

अमरावती, संजय शेंडे, 07 फेब्रुवारी: भाजप सत्तेत येण्या आधी जनतेला विकास विकास विकास असे सांगत होते. आता मात्र विकास विसरून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून समाजात दंगे भडकविण्याचा त्यांचा हेतू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. अमरावती येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेत ते बोलत होते.

VIDEO : तुम्ही अडवाणींसोबत काय केलं? भुजबळांचं मोदींना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी संपूर्ण राज्यात परिवर्तन सभा घेत आहे. या सभेची सुरुवात कोल्हापुरातून झाली होती. अमरावती येथे झालेल्या सभेत भुजबळांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. "वो मंदिर नही सरकार बनाना चाहते है,इस देश मे कितने मूर्ख है एक बार फिर अजमाना चाहते है", असा टोला लगावत भुजबळांनी मोदींची मिमिक्री देखील केली.

शरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ

सभेत माजी मंत्री जयंत पाटील यांनी निवडणुकी पूर्वी भाजप ने जनतेला दिलेले आश्वासने आणि सत्तेत आल्यावर त्या वरील विधानाची क्लिप दाखवून सरकारची चांगलीच पोल खोल केली. यामध्ये 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे नरेंद्र मोदी यांनी निवडणुकी पूर्वी सांगितले होते. मात्र सत्तेत आल्यावर अमित शहा यांनी "ये तो चुनावी जुमला है"असे म्हटले अशा अनेक क्लिप दाखवून एक प्रकारे सरकारची पोल खोल केली.

विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात भाजपने जर आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात हिंसाचार होऊ शकतो असे म्हटले होते.


Special Report : अस्सल हुर्डा खाऊ घालणारा इंजिनीअर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या