सचिन अहिरांच्या हाती शिवबंधन, मुंबईत राष्ट्रवादीला धक्का

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडत हाती शिवबंधन बांधलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 11:39 AM IST

सचिन अहिरांच्या हाती शिवबंधन, मुंबईत राष्ट्रवादीला धक्का

मुंबई, 25 जुलै : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडत हाती शिवबंधन बांधलं आहे.

'हा निर्णय घेताना मला त्रास झाला. पण राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात,' असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी सोडताना सचिन अहिर यांनी काढले आहेत. 'शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल,' असंही सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

सचिन अहिर यांची राजकीय कारकीर्द

- राष्ट्रवादीचे मोठे नेते

- शरद पवार यांचे निकटवर्तीय

Loading...

- राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा

- आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री

- वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहिलं

- मुंबईत कामगार संघटना उभारण्यात मोठा वाटा

- म्हाडाचं अध्यक्षपदही भूषवलं

मुंबईतील राष्ट्रवादीची स्थिती

महाराष्ट्रात 1999 पासून 15 वर्ष सत्तेत असून ही मुंबईत प्रभाव पाडण्यात राष्ट्रवादीला यश आलं नाही. शिवसेनेतून छगन भुजबळ राष्ट्रवादीत आले आणि मुंबईत पक्षाला चेहरा मिळाला. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन अहिर यांनी मुंबईत कामगार संघटना बांधल्या आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीची काहीशी संघटनाबांधणी झाली.

आधी म्हाडाचे अध्यक्ष आणि नंतर गृहनिर्माण राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करत सचिन अहिर हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या प्रबळ होत गेले.

VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...