अमोल कोल्हेंनी घेतली तरुणांची फिरकी, बारामतीत तुफान फटकेबाजी

अमोल कोल्हेंनी घेतली तरुणांची फिरकी, बारामतीत तुफान फटकेबाजी

अमोल कोल्हेंनी जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, मात्र उपस्थित युवकांची फिरकीही घेतली.

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती, 21 जुलै : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, मात्र उपस्थित युवकांची फिरकीही घेतली.

'पूर्वीच्या काळी सायकलच्या मधून पाय टाकून सायकल चालवण्याची स्पर्धा असायची. तर कॅरियरवर डबल सीट बसवून सायकल चालवणं हे वेगळंच कसब असायचं. मी कॅरियरवर बसवून म्हणतोय पुढच्या नळीवर नाही,' असं म्हणत अमोल कोल्हे यांनी उपस्थित युवकांची फिरकी घेतली. 'मी फक्त बालपणाच्या आठवणी सांगतोय पण तुमचं हसणं बरंच काही सांगून जात आहे,' असा चिमटाही त्यांनी उपस्थित तरुणांना काढला.

सायकल आणि अमोल कोल्हेंची फटकेबाजी

'पूर्वी अभिमानाची बाब असणारी सायकल नंतरच्या काळात काही लोकांना कमीपणा वाटायला लागला. पण ज्यांना कमीपणा वाटला, त्यांनाच नंतर म्हातारपणी व्यायाम म्हणून सायकल चालवण्याची पश्चातबुद्धी व्हायला लागली. काहीजण आयुष्यभर पोटासाठी धावतात, नंतर मात्र पोटं कमी करण्यासाठी धावतात,' असाही टोला अमोल कोल्हेंनी लगावला.

डॉ. कोल्हे यांचं भाषण सुरु असताना उपस्थित युवकांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला होता. त्यावर बोलताना अमोल कोल्हेंनी उपस्थितीत युवकांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होतात की फक्त ऐकण्यासाठी, अशी विचारणा केली. तसंच 'भावांनो आता तरी जागे व्हा. तुमच्याकडे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या मनगटातील ताकदीवर तुमचं भविष्य ठरणार आहे. त्यामुळं व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका,' असं आवाहनही कोल्हे यांनी उपस्थित तरुणांना केलं.

तुम्ही मासांहारी आहात? मग पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 09:32 AM IST

ताज्या बातम्या