अमोल कोल्हेंनी धनगर आरक्षणाबाबत पहिल्यांदाच घेतली जाहीर भूमिका

अमोल कोल्हेंनी धनगर आरक्षणाबाबत पहिल्यांदाच घेतली जाहीर भूमिका

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

  • Share this:

बारामती, 8 जुलै : धनगर आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

बारामतीत आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अमोल कोल्हे भाषण करत असताना तेथील काही लोकांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहेत.'

'आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,' अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.

अजित पवारांची विनंती अन् कोल्हेंची उपस्थिती

आजारी असताना ही अजित पवारांच्या विनंतीला मान देवून खासदार अमोल कोल्हे  यांनी बारामतीतील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. 'तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असले तरी तुम्ही पाच मिनिटे का होईना बारामतीच्या कार्यक्रमाला या,' अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे आजारी असतानाही बारामतीच्या कार्यक्रमाला अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली.

दरम्यान, बारामती शहरात दरवर्षी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील हे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती भव्य दिव्य स्वरुपात साजरी करतात. यावेळी झालेल्या जयंती उत्सवासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, आमदार रामराव वडकुते हे मंचावर उपस्थित होते.

SPECIAL REPORT : दिल्लीनंतर थेट शेती, नवनीत राणांची अशीही बांधिलकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या