आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, राष्ट्रवादी आणि उदयनराजेंबद्दल म्हणाले.....

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, राष्ट्रवादी आणि उदयनराजेंबद्दल म्हणाले.....

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : 'लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मरगळ आली आहे. सत्तेपासून दूर राहता येत नाही. आरक्षण निर्णयामुळे तरूण मराठा समाज भाजपसोबत आहे,' असं म्हणत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे.

शिवेंद्रराजे यांचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्यासोबत असलेले मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. मात्र आमदारकीचा राजीनामा देताना शिवेंद्रराजे यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. 'उदयनराजे हे मोठे बंधू आहेत. ते भविष्यातही माझ्यासोबत कायम राहतील. उदयनराजेंसोबत कोणताही वाद नाही,' असं म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंसोबतच्या मतभेदावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, राज्यभरात सुरू असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची गळती थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसचा एक आमदार उद्या 31 जुलै (बुधवार)भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, आमदार वैभव पिचड आणि काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची पुण्यातील निवास्थानी भेटही घेतली होती. पण त्यानंतर शिवेंद्रराजेंचा भाजपप्रवेश रोखण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचं दिसत आहे. कारण बुधवारी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

VIDEO: भाजप प्रवेशाची आता 'पुणे स्टाईल' खिल्ली, 5 मिनिटांत 25 बातम्यांचा आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या