जितेंद्र आव्हाडांनी घेतली अरूण परेरांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज अरूण परेरा यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2018 07:39 PM IST

जितेंद्र आव्हाडांनी घेतली अरूण परेरांची भेट

ठाणे, ता. 30 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माओवादी समर्थक म्हणून  घरातच स्थानबद्द असलेले अरूण परेरा यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना त्यांच्याच घरी स्थानबद्द करण्यात आलंय. अटकेतले सर्व कार्यकर्ते हे नक्षलसमर्थक असतील मात्र ते नक्षलवादी नाहीत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. ज्यांना अटक केली होती त्यांच्या कुटूंबियांची घरी जावून भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर आज आव्हाड यांनी परेरांच्या घरी जावून भेट घेतली. या आधी काही व्हिडीओ व्हायरल झाल्याने सुरवातीला आव्हाड यांच्या भेटीवरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र नंतर आव्हाड यांनी भेटीचा फोटो ट्विट करून परेरा यांची भेट झाल्याचं स्पष्ट केलं.

कोण आहेत अरूण परेरा?

  • मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.

Loading...

  • मानवाधिकार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या चळवळीतले ते खंदे कार्यकर्ते मानले जातात.

  • 2007 मध्ये त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी त्यांना 11 प्रकरणांमध्ये आरोपी केले होते.

  • 2011 मध्येही त्यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

  • २०१६ मध्ये अरूण परेरा यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पुर्ण केलं.

  • ते सध्या वकिल म्हणूनही काम करतात. मानवाधिकाराची अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...