पवारांना शह देण्यासाठी भाजपची खेळी, राष्ट्रवादीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 09:23 AM IST

पवारांना शह देण्यासाठी भाजपची खेळी, राष्ट्रवादीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

मुंबई, 5 जून : नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असंही महाजन म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी सरकारने ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आता सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.

सरकारच्या या निर्णयाचा फटका बारामतीसह इंदापूर तालुक्यालाही बसणार आहे. त्यामुळे इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देऊ,' अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

दरम्यान, वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस , सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातुन बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते. ४ एप्रिल २००७ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वतःची राजकीय ताकद वापरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातुन बारामती व इंदापूर तालुक्याला व ४० टक्के पाणी फलटण , माळशिरस , सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करण्यात आला होता.


SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जीवाला धोका

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MLANCP
First Published: Jun 5, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...