राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांचा या निर्णयाला कडाडून विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार, अशी चर्चा होती. या विलिनीकरणाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध केला, अशी माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत ठासून सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 05:59 PM IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांचा या निर्णयाला कडाडून विरोध

सागर कुलकर्णी

मुंबई, 1 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या बैठकीनंतर अनेक प्रकारे चर्चा होत होत्या. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार, अशीही चर्चा होती.

या विलिनीकरणाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध केला, अशी माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत ठासून सांगितलं.

पक्षाचं स्वतःचं असं एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवेल, कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

लोकसभा निवडणुकीतला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारांसोबत वन टू वन चर्चा केली.

Loading...

वंचित बहुजन आघाडी आणि मनसे फॅक्टर याबद्दलही नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. या विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळेपक्षा जास्त जागा मागण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. 2009 साली राष्ट्रवादी पक्षाने 114 विधानसभेच्या लढवल्या होत्या आणि काँग्रेसने 174 जागा लढवल्या होत्या पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करेल, अशी शक्यता आहे.

जिंकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य

जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला ती जागा दिली पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत निघाला. कुणाचे कोणते पारंपरिक मतदारसंघ आहेत हे न पाहता जो उमेदवार मतदारसंघ जिंकेल त्याला प्राधान्य द्यायचं, अशी राष्ट्रवादीची भूमिका असेल, अशी माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी शरद पवारांची भूमिका आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी देणार

विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत एकत्र लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. या निवडणुकीत महिला आणि तरुणांना जास्त संधी देणार, असं ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

============================================================================================

VIDEO: ईडीच्या झटक्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अर्धवट सोडली बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...