राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का? 'राजें'च्या शिवसेना प्रवेशाची चर्चा

आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 09:07 AM IST

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का? 'राजें'च्या शिवसेना प्रवेशाची चर्चा

सातारा, 18 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे.

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले आहेत.

काय म्हणाले उदयनराजे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उदयनराजे रागाने बाहेर पडले. नीरा नदीच्या पाण्यावरून उदयनराजे आणि रामराजेंमधील वादानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या उदयनराजेंनी चर्चेतून बाहेर पडत शरद पवारांचा निर्णय कोणताही असेल तो मला मान्य असल्याचं सांगितलं. तसंच आधी पिसाळलेल्यांनी आवरा असेही रामराजेंचे नाव घेता उदयनराजे म्हणाले.

Loading...

रामराजेंचा पलटवार

नीरा डावा कालव्याच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीत वादंग पेटलं आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या घणाघाती आरोपांना रामराजे निंबाळकरांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे. उदयनाराजेंना आवरा अन्यथा आम्ही राष्ट्रवादी सोडू, असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.


SPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: NCP
First Published: Jun 18, 2019 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...