राष्ट्रवादीला आणखी एक धक्का.. राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या संपर्कात?

राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राजेश टोपे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता टोपे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 10:23 PM IST

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का.. राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या संपर्कात?

मुंबई, 27 जुलै- राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राजेश टोपे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता टोपे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे. घनसांवगी विधानसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना 24 हजार मतांचे लीड मिळाल्यामुळे राजेश टोपे यांची चांगलीच गोची झाली आहे. तीन वेळा आमदार असलेल्या राजेश टोपे यांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. घनसांवगी हा मतदारसंघ सेनेकडे असल्यामुळे टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवला होता. या विजयामुळे राज्यात शिवसेना-भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला आहे. अवघ्या तीन महिन्यांवर राज्यात विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे विरोधी पक्षातील नेत्यांची झोप उडाली आहे. त्यात जालन्यातील घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांचाही समावेश झाला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ पुढील आठवड्यात भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. वैभव पिचड यांनी ठरल्यानुसार सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. हे सर्वजण पिचड यांच्यासह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 30 जुलैला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मदतीने राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे.

VIDEO : पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, भाजपवरही केला आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 10:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...