News18 Lokmat

'प्रज्ञासिंहच्या रुपात भाजपचा खरा चेहरा समोर आला, दहशतवाद्याला उमेदवारी देऊन शहिदांचा अपमान'

26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्रज्ञा सिंहच्या रुपात भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 05:11 PM IST

'प्रज्ञासिंहच्या रुपात भाजपचा खरा चेहरा समोर आला, दहशतवाद्याला उमेदवारी देऊन शहिदांचा अपमान'

मुंबई, १९ एप्रिल- एका दहशतवाद्याला उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहिदांचा अपमान केला आहे. मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने भोपाळमधून उमेदवारी आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्रज्ञासिंहच्या रुपात भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली आहे.

हेमंत करकरे मालेगाव स्फोटाचा तपास करताना त्यात वापरण्यात आलेल्या गाडीचा छडा लावला होता. स्फोटात वापरण्यात आलेल्या प्रज्ञासिंहच्या नावे होती. यामुळे प्रज्ञा सिंहला तुरुंगात जावे लागले होते.

हेमंत करकरेंना माझा शाप भोवला- प्रज्ञासिंह

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच सव्वा महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले आहे. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना विनंती केली होती.  पण आपल्याकडे प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते, याची आठवण साध्वी यांनी करून दिली.'

आणखी काय म्हणाले नवाब मलिक?

Loading...

- गेल्या पाच वर्षांत तपास यंत्रणांचे दबाव आणण्यात आला.

- साध्वी सध्या जामिनावर आहेत. सुटल्या नाहीत.

- दहशतवादी संपवण्यासाठी भाजपला मतदान करा. म्हणणारे आता साध्वीला उमेदवारी देताहेत.

- भाजप दहशतवाद्यांच्या नावावर मत मिळवतात.

- साध्वी एक मोठ्या शहिदाला दहशतवादी म्हतातहेत. भाजपचा खरा चेहरा पुढे आला आहे. भाजपने एका अतिरेक्याला उमेदवारी देऊन शहिदांचा अपमान केलाय.

- साध्वी म्हणतात माझ्या शापामुळे हेमंत करकरे मेले.

- अशा लोकांना जनता धडा शिकवेल.

- राज्यातले चारही केंद्रीय मंत्री जिंकून येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

- आमचे राज्यात २८ जागा येतांना आम्हाला दिसताहेत.

- प्रकाश आंबेडकर वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण ही वेळ प्रयोगाची नाही.

- लोक वंचित आघाडिला स्विकारणार नाही.त्यांचा फटका आम्हाला बसणार नाही.

अतिरेकी विचारांच्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हायला- जयंत पाटील

' ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांच्या विषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञासारख्या आरोपी महिलेस लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला या देशात यापुढे कोणत्या प्रकारचे राजकारण करायचे आहे हे स्पष्ट दिसते आहे. भाजप कार्यकारीणीला आणि नेत्यांना आपल्या या निर्णयाची लाज वाटायला हवी. साध्वी प्रज्ञासारख्या अतिरेकी विचारांच्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी.'

- जयंत पाटील,  प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस


VIDEO : करकरेंबाबत वादग्रस्त विधान, न्यूज 18 च्या प्रश्नावर साध्वींचे 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...