राष्ट्रवादीला मोठं खिंडार... मुलासोबत आता मधुकर पिचडही जाणार भाजपात

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे आमदार पुत्र वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. अकोले येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 08:22 PM IST

राष्ट्रवादीला मोठं खिंडार... मुलासोबत आता मधुकर पिचडही जाणार भाजपात

हरीष दिमोटे (प्रतिनिधी)

अहमदनगर, 27 जुलै- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे आमदार पुत्र वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. अकोले येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. पिचड पिता-पुत्राच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे. तर कार्यकर्त्यांनीही पिचडांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे. वैभव पिचड रविवारी (28 जुलै) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. 30 किंवा 31 जुलैला ते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

शरद पवारांची साथ सोडताना दु:ख होतेय...

माझा कोणावरही राग नसून शरद पवारांची साथ सोडताना दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया मधुकर पिचड यांनी दिली आहे. शरद पवारांना सोडून जाण्याचे दु:ख आहे. मात्र मतदार संघातील सामान्य जनता तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी जाणीव पूर्वक निर्णय घ्यावा लागल्याचे पिचड यांनी यावेळी सांगितले. लोकांच्या भावना, जनमत आणि जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याने भाजपत जात असल्याचे पिचड यांनी जाहीर केले आहे.

विकास कामे रखडली...

Loading...

मतदार संघातील विकास कामे रखडली होती. आंदोलन करुन उपयोग झाला नाही. मी जे आश्वासन जनतेला दिले होते ते पूर्ण करता आले नाही. कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत अकोले मतदार संघाने मोठा लिड दिला. परंतु लोकसभेला भाजपला देशात मोठे यश मिळाले. मतदार संघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आघाडीचा एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेशाची केलेली घोषणा म्हणजे विखे पाटलांनी घातलेल्या सादेला प्रतिसाद तर नाही ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.

जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...