'ओरिजिनल नाव नकोच आता, नाही तर फुटणार,' आव्हाडांकडून फिरकी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची फिरकी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 12:13 PM IST

'ओरिजिनल नाव नकोच आता, नाही तर फुटणार,' आव्हाडांकडून फिरकी

मुंबई, 10 मार्च : 'आपल्या पक्षाला शिव्या देणाऱ्या ट्रोल्सना घरातून बाहेर काढून फटकवा,' असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची फिरकी घेतली आहे.

"काय योगायोग मी सकाळी बोललो आणि योगायोग @RajThackeray संध्याकाळी म्हणाले घरात घुसून मारा. ट्रोलर्स नाव बदलून घेत आहेत ट्विटरवर...ओरिजिनल नाव नकोच आता नाहीतर फुटणार," असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.दरम्यान, वर्धापनदिनाच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपचा जोरदार समाचार घेतला. मोदींच्या आयटी सेलमध्ये बसलेली बेवारस मुलांकडून केल्या जाणाऱ्या ट्रोलला मी भीक घालत नाही, असे सांगत राज यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर 'सर्जिकल स्टाईक' केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी भागीदार कसा चालतो असा सवाल देखील त्यांनी विचारला.

Loading...

'लोकसभा निवडणुकीसंदर्भात लवकरच निर्णय'

गेल्या 24 फेब्रुवारी रोजी मी कोल्हापुरात बोललो होतो. त्यानंतर आज बोलतोय. मी गेले कित्येक दिवस पत्रकारांनी भेटलोच नाही तर पत्रकार स्वत: ठरवतात की, मनसेने 3 जागा मागितल्यात 4 जागा मागितल्या. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी लवकरच निर्णय घेईन. तो तुम्हाला सांगितला जाईल, असे राज म्हणाले.

'रोज नवं काही तरी घडावं अशी मोदींची इच्छा'

तुम्ही मागच्या घटना विसराव्यात यासाठी मोदी सरकारला रोज नवी काही तर घडाव असे वाटते. गेल्या पाच वर्षात सरकारने इतके विषय दिले आहेत की एका सभेत ते संपणार नाहीत. माझ्या पुढील सभेत त्याचा समाचार घेईन असे राज म्हणाले.


VIDEO : '...तर निकालानंतर पश्चाताप करू नका', स्वाभिमानीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 10:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...