लोकसभा निकालापूर्वीच राष्ट्रवादीला धक्का..जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत प्रवेश

लोकसभा निवडणुकीचे उद्या (ता.23) निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्याधीच राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी दुपारी जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 07:22 PM IST

लोकसभा निकालापूर्वीच राष्ट्रवादीला धक्का..जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, 22 मे- लोकसभा निवडणुकीचे उद्या (ता.23) निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्याधीच राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी दुपारी जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

शिवसेना भवनात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकृत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलंय. जयदत्त क्षिरसागर यांच्या सारखा दिग्गज नेता शिवसेनेत गेल्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेची ताकत आणखी वाढणार आहे. सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत मजबूत स्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीत होत होती घुसमट...

मागील काही दिवसांपासून आपली घुसमट होत होती, असे जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. शिवसेना जात-पात पाळणारा पक्ष नाही, असंही त्यांनी सांगितले. दरम्यान, जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते. यातूनच लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली. पण आपण नक्की शिवसेनेत की भाजपमध्ये प्रवेश करणार, हे क्षीरसागर यांनी स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला होता.

Loading...

काय म्हणाले उद्धव ठाकरे..

एक्झिट पोल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश यांचा काहीही संबंध नाही. बीड जिल्हा आम्ही थोडं दूर्लक्षित केला होता. आता, मात्र आम्ही जोरात तयारी केलीय. जयदत्त क्षीरसागर आज सहकुटुंब, सहपरिवार शिवसेनेत आल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  गेल्या वेळी प्रियांका चतुर्वेदी आल्या तेव्हा निवडणूका व्हायच्या होत्या. शिवसेनेबद्दलच्या आकर्षणापोटी आपण शिवसेनेत यायचा निर्णय घेतला. शिवसेनेसाठी बीड जिल्हा हा दूर्लक्षीत राहिला होता. तो दुष्काळी वगैरे नव्हता पण, तशी पेरणी शिवसेनेनंच कधी केली नव्हती. मात्र, आता मराठवाड्यासाठीची मोठी जबाबदारी आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात असलेली जबाबदारी त्यांना मिळेल. उद्या निकाल आहेच, अवघे काही तास बाकी आहेत. सगळी उत्तरं मिळतीलच, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मीडियालाच सवाल केला, ते म्हणाले, 'एक्झिट पोल कुणाच्या बाजुनं आले आहेत? एनडीएच्या ना...मग, एक्झिट पोलही इव्हिएमवरुनच काढले का?? एक्झिट पोलचे आकडे फिरु शकतील, या विरोधकांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. मीडियाला उद्देशून, तुम्ही सांगताय ते आकडे कमी पडतील.

मी काही भविष्यकार नाही

'निकालाआधी सर्व चॅनेल्सचे एक्झिट पोल आहेत. यामध्ये एनडीएच्या बाजूने कौल दिसत आहे. त्यामुळे लोकांचा मोदींच्या सरकारवर विश्वास असल्याचं दिसत आहे. पण मी काही भविष्यकार नाही ज्यामुळे सांगू शकेल की कुणाचं सरकार येणार आणि किती दिवस टिकणार,' असं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

धनंजय मुंडेंवर नाराजी

जयदत्त क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्तांची बैठक बोलावली होती. या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्षनेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात आला होता. 'ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतलं जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जाहीर भाषणात क्षीरसागर समर्थकांनी केला होता.


VIDEO : धनंजय मुंडेंचा नवा लूक पाहिला का तुम्ही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...