छगन भुजबळ आक्रमक, 'जलपूजन' करून दिलं फडणवीसांना आव्हान

हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचा दावाही भुजबळांनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांनी लक्षं घातल्यानेच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 03:26 PM IST

छगन भुजबळ आक्रमक, 'जलपूजन' करून दिलं फडणवीसांना आव्हान

प्रशांत बाग, नाशिक 25 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. नाशिक जिल्ह्यातला महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मांजरपाडा जल प्रकल्पाचं छगन भुजबळ यांनी आज 'जलपूजन' केलं. भुजबळांचं हे जलपूजन म्हणजे प्रकल्पाचं प्रतिकात्मक उद्घाटन असल्याचं समजलं जातंय. या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यानं श्रेय घेण्यासाठी भुजबळांनी जलपूजन केल्याचं बोललं जातंय. आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प मंजूर झाला होता. आघाडी सरकार आणि माझ्या पाठिंब्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावाही भुजबळ यांनी केला.

ज्यांच्यामुळे सत्ता भोगली त्या पवारसाहेबांना काय वाटत असेल?- जितेंद्र आव्हाड

आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्प मंजूर झाला होता. मात्र त्याचं फारसं काम पुढे जाऊ शकलं नाही. गेल्या काही वर्षात कामाला वेग येऊन प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे याचं श्रेय घेण्यावरून आता राजकारण सुरू झालंय. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्याच्या आतच जलपूजनाची खेळी भुजबळांनी खेळलीय.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पात महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यात आलं आहे. हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचा दावाही भुजबळांनी केला आहे. वर्षानुवर्ष दुष्काळामध्ये असलेल्या येवला व चांदवडसह दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पामुळे फायदा होणार असल्यादा दावा करण्यात येतोय.

Loading...

सचिन अहिरांनी शिवसेना प्रवेशाबद्दल शरद पवारांना काय सांगितलं, पाहा VIDEO

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पुर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणाऱ्या या प्रकल्पाला भुजबळ जलसंपदामंत्री असताना 2006मध्ये मान्यता मिळाली होता.

गुजरातसह समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात पूर्वेकडे वळविणारी ही राज्यातील पहिलीच योजना आहे. मांजरपाडा वळण योजनेंतर्गत देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून ते पाणी बोगद्याद्वारे प्रवाही पध्दतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगांव धरणाच्या वरील बाजूस ऊनंदा नदीत सोडण्यात आलंय. त्यासाठी 10.16 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

सोलापुरातील 4 नेते युतीच्या संपर्कात, एकाने घेतली भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट

सरकारचा दावा

2014मध्ये राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाची चौकशीही झाली होती. त्यानंतर युती सरकारने या योजनेच्या कामाला वेग दिल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. लोकसभेतल्या पराभवानंतर भुजबळांचं लक्ष्य आता विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सरकारलाच आव्हान दिल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...