आता मित्रपक्षही म्हणतोय, चौकीदारही चोर है ; भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

आता मित्रपक्षही म्हणतोय, चौकीदारही चोर है ; भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून 'चौकीदारही चोर है' अशी घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर पंढरपूर इथं झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्याच घोषणेचा उच्चार करत मोदींना धारेवर धरलं.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : 'चौकीदारही चोर आहे, असं आता तर मित्रपक्षही म्हणू लागला आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेला रायगडमधून सुरूवात झाली. त्यावेळी भुजबळांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून 'चौकीदारही चोर है' अशी घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर पंढरपूर इथं झालेल्या सभेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्याच घोषणेचा उच्चार करत मोदींना धारेवर धरलं. याचा दाखला देत आता छगन भुजबळांनी भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेत आज सकाळी यात्रेला सुरूवात झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पावर यांच्या उपस्थितीत महाडमधील चवदार तळे इथं जाहीर सभादेखील होणार आहे.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा हा पहिला टप्पा असून रायगड, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. या सभांमधून राष्ट्रवादी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. केंद्रातील राफेल प्रकरण आणि राज्यातील दुष्काळाची स्थिती या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते सरकारला धारेवर धरतील.

Loading...

'सरकारवरचा विश्वास उडाला म्हणून परिवर्तन गरजेचं'

या भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, म्हणून परिवर्तन होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे , सुनील तटकरे यासांरखे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.


VIDEO : पंकजा मुंडेंनी निर्धाराची 'पायरी' ओलांडली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...