माजी मुख्यमंत्र्यांचा भाऊ आणि आमदार करणार शिवसेनेत प्रवेश, विदर्भातही राष्ट्रवादीला सुरुंग

नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 01:02 PM IST

माजी मुख्यमंत्र्यांचा भाऊ आणि आमदार करणार शिवसेनेत प्रवेश, विदर्भातही राष्ट्रवादीला सुरुंग

अक्षय कुडकेलवार, पुसद, 28 जुलै : विदर्भात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे. कारण पुसद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक हे आपल्या दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची बंधू आहेत.

मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक मंगळवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. मनोहरराव नाईक हे स्वत: शिवसेना प्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. मात्र त्यांच्या हातावरही शिवबंधन बांधले जाईल. मनोहरराव नाईक यांच्याऐवजी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक हेच आगामी विधानसभा निवडणुकीचा पुसदमधील चेहरा असतील, अशी चर्चा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी पोषक वातावरण नसतानाही मनोहरराव नाईक पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, 'सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'काही नेते सोडून गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. मी याआधीही अशी परिस्थिती बघितली आहे. यातून कसा मार्ग काढायचा याची आम्हाला कल्पना आहे,' असंही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीतून सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे,' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Loading...

जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...