S M L

Lok sabha election 2019 : केंद्रात फसवाफसवी करणारं सरकार - अजित पवार

'उमेदवारी अर्ज भरायला येताना स्वतःचं वाहन असेल तर पेट्रोल, डिझेल स्वतःच्या पैशाने भरून या.'

Updated On: Mar 15, 2019 03:21 PM IST

Lok sabha election 2019 : केंद्रात फसवाफसवी करणारं सरकार - अजित पवार

इंदापूर, 15 मार्च  : केंद्रात आणि राज्यात सरकारने थापेबाजी करुन जनतेला फसवलं आहे. त्यामुळे हे फक्त थापेबाजी करणारं सरकार आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेका विरूद्ध लढली तरी आता एकोप्याने भाजप-शिवसेनेशी लढू असंही ते म्हणाले. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून त्यांनी काँग्रेसलाही टोले लगावले.

काय म्हणाले अजित पवार?

ग्रामपंचायत ,मार्केट कमिटी ,बँक ,विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढले. पण आता एकोपा दाखवू.


आचारसंहिता लागली आहे त्यामुळे आता कामे घेऊन येऊ नका नोकऱ्या लावा, बदली करा, फी मध्ये सवलत वगैरे अर्ज घेऊन येऊ नका.

उमेदवारी अर्ज भरायला येताना स्वतःचं वाहन असेल तर पेट्रोल, डिझेल स्वतःच्या पैशाने भरून या.

दुष्काळ असला तरी सरकार छावण्या काढू देत नाही. कारखाने बंद आहेत, चारा नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहे. दुधाचे 5 रुपये अनुदान तरी सरकारने दिले पाहिजे.

Loading...

दिलीप गांधी जन संघा पासून निष्ठवान, सुजय विखे मिळाला  आणि भाजप त्यांना दिलं सोडून दिलं.

वडील म्हणाले मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही म्हणे, मग मतदारांना कसं समजवणार?

मतदार म्हटले तर पोरग  तुमचं ऐकत नाही आम्ही का ऐकावं शिवसेना म्हणतेय मुलगा भाजप मध्ये गेला. वडिलांनी सेनेत यावं.

15 लाख कसे द्यायचे म्हणून नोटबंदी केली. नोटबंदी केली तर काळा पैसा बाहेर येईल पण नुसतं फसवलं.

सुप्रिया च्या विरोधात उमेदवार कोण? रोज वेगवेगळी नावे सांगत आहेत. पण गाफील राहू नका.

शिवसेना पालिकेत 20 वर्षे सत्तेत. साधे त्यांना साधे पुल दुरुस्त करता येत नाही. त्यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे.

अच्छे दिन नको पहिले होते तेच चांगले तेच परत द्या असं लोकम्हणत आहेत.

उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 03:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close