EVM बाबत अजित पवारांनी मीडियावरच फोडलं खापर, लोकशाहीत जनतेचे मत महत्त्वाचं

EVM बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत वेगळं, अजित पवार यांचे मत वेगळं आणि सुप्रिया सुळे यांचं मत वेगळं, असं मीडियाने पसरवून संभ्रम निर्माण केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:54 PM IST

EVM बाबत अजित पवारांनी मीडियावरच फोडलं खापर, लोकशाहीत जनतेचे मत महत्त्वाचं

अदैत मेहता, (प्रतिनिधी)

पुणे, 18 जुलै- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी EVM बाबत मीडियावर खापर फोडले आहे. EVM बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत वेगळं, अजित पवार यांचे मत वेगळं आणि सुप्रिया सुळे यांचं मत वेगळं, असं मीडियाने पसरवून संभ्रम निर्माण केला आहे. मात्र, लोकशाहीत बहुसंख्य लोकांचे मत काय ते महत्त्वाचं आहे. माझं ही मत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असंच आहे. पुणे शहर कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार बोलत होते.

288 पैकी 145 आमदार निवडून आल्यावर ज्या त्या पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, हे ठरवावे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे असतील की दुसरा कोणी असेल, हा त्यांचा प्रश्न. मी त्यात नाक खुपसणार नाही, असे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. गोवा झालं, कर्नाटक गेल्यात जमा आहे.त्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थानचा नंबर आहे. निवडून येण्यासाठी माणसं फोडली जातात, असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला.

नरेंद्र मोदींच्या नावावर कुणीही निवडून येत आहे. नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. पिंपरी-चिंचवडमध्ये दहशत वाढली आहे. पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी वाढली आहे. माथाडी संघटनांची दहशत आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी पुण्यातून काढता पाय घेतला आहे. या सगळ्या कंपन्या, गुंतवणूक आम्ही आणली पण आता दहशत, गुंडगिरीमुळे परदेशी कंपन्या निघून चालल्या आहेत, असे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. सत्तेत मोर्चा काढणं ही बनवाबनवी, फसवाफसवी असून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दांत पवारांनी सत्ताधारी सरकारचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीमुक्त पश्चिम महाराष्ट्रला राष्ट्रवादीमय पश्चिम महाराष्ट्रने उत्तर देऊ, असे थेट आव्हान अजित पवार यांनी यावेळी दिले. 2014 ला टोलमुक्त महाराष्ट्र अशी भाजपने घोषणा दिली आणि सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले, टोल भरावाच लागेल. बोगदे बांधण्याचा नावाखाली सरकार 1000 कोटी लाटणार असल्याचा आरोप पवारांनी केला. हे सरकार पुन्हा आल्यावर शेअर मार्केट पडलं, लोकांचे 5 लाख कोटी बुडले. महागाई वाढली. वाहन विक्री मंदावली. शो रूम बंद पडल्या. पण लोकांनी फक्त पुलवामा, बालाकोट डोक्यात घेतलं. पाकिस्तानात घुसून मारले.

फुल टू कॉमेडी एक्स्प्रेस..

Loading...

कुणालाही तिकीट दिलं तर निवडून आणा, लक्ष्मी नारायणाचा जोडा आणि लावू एकमेकांना झोडा...रामदास आठवले यांच्यासारखं जमायला लागलं की, फुल टू कॉमेडी एक्स्प्रेस आहे,असे अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

हा निवडणूक आचारसंहितेचा भंगच

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदानाच्या आधी हिमालयाच्या गुहेत गेले होते. तिथे कधी गुहा बांधली. तिथून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा निवडणूक आचारसंहितेचा भंगच आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. आता तर EVM वरून सरकारच्या कोलांटउड्या सुरूच आहे. Evm मधूनच बारामतीत सव्वा लाखांने आम्ही निवडून आलो. निवडणूक आयोग रिस्पॉन्स देत नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणतं निवडणूक आयोग म्हणेल ते ऐकू. बहिष्कार टाकला तर 5 वर्षे निवांत बसावे लागेल, असे पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीच्या माजी आमदारासाठी अजित पवार मैदानात...

दुसरीकडे, चाकण हिंसाचार प्रकरणी सरकार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना विनाकारण टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे. मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोप ठेऊन माजी आमदार दिलीप मोहितेच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.

'चाकण दंगल प्रकणी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. वातावरण चिघळयाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग्य दिशेने तपास व्हायला हवा. कुणालाही टार्गेट करू नका,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, हे षडयंत्र केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच केलं जात असल्याचा आरोप दिलीप मोहितेंनी केला आहे.

चाकण हिंसाचारप्रकरणी दिलीप मोहिते रडारवर?

गेल्यावर्षी चाकणमध्ये 30 जुलैला मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची झळ त्यावेळी पोलिसांनाही पोहोचली होती. म्हणूनच स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी दंगलखोरांवर गुन्हे दाखल करून त्यावेळी तब्बल 84 जणांना अटकही केली. पण आता हेच जुनं प्रकरण उकरून काढून राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंना अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी मोहितेंच्या घरासमोर मोठा फौजफाटाही तैनात केला गेला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून चाकण परिसरात मोठा तणावही निर्माण झाला होता. आता मुख्यमंत्री फडणवीस या वादात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

VIDEO : खेकड्याने डोंगरीतली इमारत पाडली का? अजित पवारांची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...