अजित पवार विधानसभेत आक्रमक, चंद्रकांत पाटील अडचणीत

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधकांनी चद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 03:02 PM IST

अजित पवार विधानसभेत आक्रमक, चंद्रकांत पाटील अडचणीत

मुंबई, 27 जून : भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील विधानसभेत अडचणीत सापडले आहेत. कारण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधकांनी चद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विधानसभेत काल राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर केलेले आरोप विधीमंडळ पटलावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आज त्याच आरोपांना चंद्रकांतदादांनी सभागृहात उत्तर दिलं. त्यामुळे मग जयंत पाटील यांनी काल केलेले आरोप पुन्हा पटलावर घ्यावेत, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी केली. याच मुद्द्यावरून अजित पवारांनीही आक्रमकपणे चंद्रकांतदादांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवार संतापले

'कामकाज नियमानुसार चालावं. एकतर्फी कामकाज सुरू आहे. लोकशाहीची थट्टा सुरू आहे काय?' असा सवाल करत अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे हे चंद्रकांत पाटलांच्या मदतीला धावले.

चंद्रकांत पाटलांवर कोणता आरोप?

Loading...

चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भूखंड घोटाळ्याचे आरोप केल्याने खळबळ उडाली. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले असून बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केली.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील मौजे बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक भूखंड राखीव होता. शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांनी खेळाच्या मैदानाची ही जागा हडप करून आपली असल्याची दाखवली. या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. मात्र याबाबत तक्रार झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. तेव्हा महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्स असल्याचा निकाल दिला. त्या जमिनीवर 300 कोटीचा प्रकल्प बिल्डरने उभा केला आहे.

VIDEO: चंद्रकांत पाटलांवरून अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...