'मी उद्या म्हणेन...देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीत यायचं आहे'

आघाडीतील नेत्यांना आपल्याकडे खेचत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना विरोधकांना घायाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 11:42 AM IST

'मी उद्या म्हणेन...देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीत यायचं आहे'

मुंबई, 28 जुलै : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आघाडीतील नेत्यांना आपल्याकडे खेचत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना विरोधकांना घायाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही विद्यमान आमदारांनी युतीची वाट धरली आहे.

'काँग्रेस राष्ट्रवादीचे अजून अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत,' असा दावा भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा केला. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपकडून असे दावे केले जात आहेत. भाजपच्या या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. उद्या मीही म्हणेन की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन होता, त्यांना राष्ट्रवादीत यायचं आहे. पण अशा दाव्यांना काही अर्थ नाही,' अशी प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतून सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे,' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

'सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'काही नेते सोडून गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. मी याआधीही अशी परिस्थिती बघितली आहे. यातून कसा मार्ग काढायचा याची आम्हाला कल्पना आहे,' असंही शरद पवार म्हणाले.

'चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि...' शरद पवारांनी केला मोेठा खुलासा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 11:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...