आमदार संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा, राष्ट्रवादीने केला पलटवार

राष्ट्रवादीचे 10 आमदार संपर्कात आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 08:25 AM IST

आमदार संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा, राष्ट्रवादीने केला पलटवार

मुंबई, 5 जून : राष्ट्रवादीचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.

'आमचे 48 खासदार निवडून येतील, असा दावा लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं का? त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते घडत नाही. ते स्वत:च निवडणुकीत दोन जागांवर पराभूत झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आमचे आमदार का असतील,' असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे 10 आमदार संपर्कात आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगत आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या लाखोंच्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेतही वंचितने वेगळी चूल मांडल्यास महाआघाडीच्या अडचणी वाढू शकतात, असं बोललं जातं.


Loading...

SPECIAL REPORT : काँग्रेसमध्ये मोठे झालेले विखे आता पक्षालाच पाडणार खिंडार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 08:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...