News18 Lokmat

उद्योग धोरणासाठी अधिकाऱ्यांवर 7 कोटींची उधळपट्टी, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या दबावाखाली उद्योग धोरण तयार करण्यात आलं आहे असा आरोपही त्यांनी केला.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 05:02 PM IST

उद्योग धोरणासाठी अधिकाऱ्यांवर 7 कोटींची उधळपट्टी, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

प्रफुल साळुंखे, मुंबई 7 मार्च  :राज्य सरकारने नुकतच राज्याचं नवं उद्योग जाहीर केलं होतं. त्या धोरणाला अधिकाऱ्यांचा विरोध होता. तो विरोध डावलण्यासाठी त्यांना विदेशात पाठविण्यात आलं आणि त्यासाठी तब्बल 7 कोटी 65 लाखांची उधळपट्टी केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

सरकारने जे उद्योग धोरण तयार केलं होतं त्याला अधिकाऱ्यांचा विरोध होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या दबावाखाली असं धोरण तयार करण्यात आलं आहे असा आरोपही त्यांनी केला. या धोरणाला अधिकाऱ्यांचा विरोध असल्यामुळे त्यांना विदेशात अभ्यासाच्या नावावर फिरायला पाठविण्यात आलं व त्यावर कोट्यवधींची उधळपट्टी केली असा आरोपही त्यांनी केला.

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

उद्योग खात्याचे अतिरिक्त सचिव सतिश गवई यांचा नव्या उद्योग धोरणाला विरोध होता त्यामुळे त्यांना आणि अधिकाऱ्यांना दोओसला अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पाठविण्यात आलं आणि त्या दौऱ्यावर 7 कोटींपेक्षा जास्त पैशांची उधळपट्टी करण्यात आली. तर दावोसच्या या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर 90 लाखांचा खर्च आला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर खर्च कसा झाला असा सवालही त्यांनी केला. अधिकाऱ्यांचा विरोध मावळावा यासाठीच त्यांना विदेश दौऱ्यावर पाठविण्यात आल्याचंही ते म्हणाले.

सरकार झोपलं होतं का?

Loading...

निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने निर्णयांचा झपाटा लावला आहे. एवढी वर्ष राज्य राज्य सरकार चार वर्षे झोपले होते का?  असा सवालही त्यांनी केलाय. 3 दिवसात कॅबिनेट च्या 2 बैठकांमध्ये 70 च्या वर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या पूर्वी हे निर्णय घेता आले असते, पण सरकार ला राजकीय फायद्यासाठी करून घ्यायचा अशी टीकाही त्यांनी केली.

तर जुलमी राजवटीपासून सुटका

लोकसभा निवडणूकांसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. बदलती राजकीय परस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राज्य सरकारने मुदतपूर्व निवडणुकीसाठी विधानसभा बरखास्त केली तर जुलमी राजवटीपासून महाराष्ट्राच्या जनतेची सुटका होईल असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...