S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मालेगावचे नगरसेवक नबी उल्ला यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

पक्ष शिस्त मोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं मालेगावमधील नगरसेवकाचं निलंबन केलं आहे.

Updated On: Apr 17, 2019 08:00 PM IST

मालेगावचे नगरसेवक नबी उल्ला यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

मालेगाव, 17 एप्रिल : अहमदनगर येथे पालिका निवडणुकीनंतर पक्ष शिस्त मोडत सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदत करणाऱ्या नगरसेवकांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं होतं. पण, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षानं हे निलंबन रद्द देखील केलं होतं. पण, आता मात्र पक्षशिस्त न पाळणाऱ्या मालगावचे नगरसेवक नबी अहेमद अहेमद उल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हकालपट्टी केली आहे. प्रदेश चिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे बेशिस्त खपवून घेणार नाही, असा निरोप राष्ट्रवादीला द्यायचा नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.


दिग्विजयसिंहांना आव्हान देणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह आहेत कोण?का केली कारवाई?

मालेगाव विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतो. ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसल आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आहेत. रोहिदास पाटील यांच्याविरोधात वंचित आघाडीतर्फे उभे राहू नका असे नबी अहेमद अहेमद उल्ला यांना पक्षाच्यावतीने सांगण्यात आले होते. परंतु पक्षाच्या आदेशाला न जुमानता नबी उल्ला यांनी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.


VIDEO : जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close