News18 Lokmat

राष्ट्रवादीकडून भंडारा-गोंदियासाठी उमेदवार जाहीर

भंडारा - गोंदियासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवाराची घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 11:38 PM IST

राष्ट्रवादीकडून भंडारा-गोंदियासाठी उमेदवार जाहीर

मुंबई, 24 मार्च : भंडारा-गोंदियासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आता उमेदवार जाहीर केला आहे. माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्याता आली आहे. भाजपकडून भंडारा-गोंदियामध्ये नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना भंडारा - गोंदीया, माढा आणि ईशान्य मुंबई या जागांवर उमेदवारी घोषणा करण्यात आलेली नव्हती. पण आताच्या या सहाव्या यादीमध्ये भंडारा-गोंदियाचा सस्पेंस संपला असं म्हणायला हरकत नाही. तर माढा आणि ईशान्य मुंबई या जागांवर अद्याप तिढा कायम आहे.


बारामतीतून सुप्रिया सुळेंना कुल यांचे आव्हान

Loading...

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रासप आमदार राहुल कुल यांचे काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे.


VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 11:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...