S M L

लोकसभा 2019: माढाचा तिढा सुटला, भाजपने 'या' उमेदवाराला दिली संधी

अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रणजीत नाईक-निंबाळकर यांना माढातून उमेदवारी दिली आहे.

Updated On: Mar 29, 2019 02:14 PM IST

लोकसभा 2019: माढाचा तिढा सुटला, भाजपने 'या' उमेदवाराला दिली संधी

माढा, 29 मार्च: अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रणजीत नाईक-निंबाळकर यांना माढातून उमेदवारी दिली आहे.माढातून कोणाला उमेदारी द्यायची यावरून गेल्या काही दिवासांपासून जोरदार चर्चा सुरु होती.भाजपने आज लोकसभेसाठीची नवी उमेदवारी जाहीर केली. यात माढासह अन्य 11 जागांवरील उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. माढ्यात आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे.सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजितसिंह यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हे देखील वाचा: काँग्रेसला आणखी एक धक्का, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर

अशी आहे भाजपची नवी यादी


लडाख (जम्मू काश्मीर) जमियांग नमग्याल

चिक्कोडी (कर्नाटक) अण्णासाहेब जोल्ले

रायचूर (कर्नाटक) राजा नायक

Loading...

कोप्पल (कर्नाटक) संगन्ना कराडी

बालाघाट (मध्य प्रदेश) ढालसिंग बिसेन

राजगड (मध्य प्रदेश) रोडमल नागर

खरगोन (मध्य प्रदेश) गजेंद्र पटेल

माढा (महाराष्ट्र) रणजित निंबाळकर

चुरु (राजस्थान) राहुल कासवान

अलवर (राजस्थान) बालक नाथ

बांसवाडा (राजस्थान) कनकमल कटारा


लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1


VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 01:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close