आदित्य Vs राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड, जनआशीर्वाद यात्रेवरून सोशल युद्ध

राष्ट्रवादी युवकने आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 11:11 AM IST

आदित्य Vs राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड, जनआशीर्वाद यात्रेवरून सोशल युद्ध

मुंबई, 1 ऑगस्ट : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनाआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. हीच संधी साधत राष्ट्रवादी युवकने आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं आहे. ही जनआशीर्वाद नव्हे तर जनसंताप यात्रा असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

सरकारचा ढिसाळ कारभार, बेरोजगारी, मराठीचे हाल अशा मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रवादीने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात या समस्या असताना आदित्य ठाकरे यांनी काढलेली ही यात्र म्हणजे जनसंताप आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडने सोशल मीडियावर आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान,  आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' आज दुष्काळग्रस्त लातूर आणि नांदेड जिल्ह्यात असणार आहे. या यात्रेची सुरुवात लातूर शहरातील दयानंद काँलेज मध्ये 'आदित्य संवाद' ने होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा लातूर पँटर्न ते भीषण पाणी टंचाईचा सामना करणारं लातूर अशा विविध प्रश्नांना आदित्य ठाकरे काय बोलणार, याकडे लातूरकरांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात यात्रांचा सुकाळ, भाजपची महाजनादेश यात्रा

Loading...

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर 'महाजनादेश यात्रा' अमरावती जिल्ह्यातून सुरू होत आहे. त्यामुळे युतीतील दोन्ही सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना अंतर्गत स्पर्धाही सुरू झाली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

राष्ट्रवादीही प्रत्युत्तर देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. येत्या 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर प्रारंभ होणार आहे.

विशेष म्हणजे या यात्रेचे नेतृत्त्व राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आणि टीव्ही अभिनेते डॉ. अमोल कोल्हे करणार आहे. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.

VIDEO: साताऱ्याची जागा आम्हीच राखणार, शिवेंद्रराजेंना पवारांचं थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...