News18 Lokmat

धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या, चेहऱ्यावर तलवारीने केले वार

परळीमधील प्रभागात टँकरने पाणी वाटपाचं काम सुरू असताना पांडुरंग हे कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर हल्ला करत पळ काढला.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 09:03 AM IST

धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या, चेहऱ्यावर तलवारीने केले वार

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 25 मार्च : बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळीच्या ओव्हर ब्रिज पुलाच्याखाली नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीने वार करून त्यांची हत्या केली आहे.

रात्री  2 वाजताच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे. परळीमधील प्रभागात टँकरने पाणी वाटपाचं काम सुरू असताना पांडुरंग हे कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर हल्ला करत पळ काढला. या हल्ल्यामध्ये पांडुरंग यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पांडुरंग गायकवाड हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सगळ्यात जवळचे नेते आहेत. तर ते नगरसेवक पदी चौविसचे मतांनी आघाडी घेत निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या अशा हत्येने संपूर्ण बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पांडुरंग यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणात पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तर परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहेत. तर पांडुरंग यांच्या अशा हत्येनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading...


VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...! 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...