09 मे : आपल्या राजकीय कारकीर्दीने आणि भाषणाने प्रत्येकाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच आज कोंडी झाली. हो, शरद पवारांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर या हॉलचा दरवाजाच चक्क लॉक झाला होता.
त्यामुळे शरद पवार आणि पत्रकार काही काळ एकाच रूम मध्ये अडकले होते. अखेर तिथल्या कर्मचाऱ्यांनी हॉलचा दरवाजा तोडून शरद पवार आणि पत्रकारांना बाहेर काढलं.
दरवाजा उघडण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झाले. मात्र जवळपास 10 मिनिटं दरवाजा उघडलाच नाही. यावेळी शरद पवार शांतपणे दरवाजा उघडण्याची वाट पाहत होते. 'राज्याचे दरवाजे कधी उघडणार?' अशी गमतीशीर चर्चा यावेळी पवारांसह अडकून पडलेल्या लोकांमध्ये सुरू झाली. ही चर्चा ऐकताच पवारांनी मिश्किल हास्य केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा