ब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला

मोदींना भाजपने पर्याय म्हणून पुढे केले असेल पण देशाला पर्याय ते ठरू शकत नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2019 02:55 PM IST

ब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला

सासवड 16 जानेवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा दिल्या असून आश्वसनाची पूर्ती केली नाही असंही ते म्हणाले. अनेक मोठ मोठ्या राजवटी जनतेने उलथून टाकल्या आहेत, हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी पंतप्रधानांना दिला.सासवडमध्ये राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.


आणखी काय म्हणाले शरद पवार?


 • लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी संधी दिली तर संधीच सोनं करा आणि लोकांशी सोन्यासारखे वागा.

 • Loading...

 • पंतप्रधान असो वा लोकप्रतिनीधी तो पक्षाचा नसतो, देशाचा असतो राष्ट्राचा विचार करायचा असतो.

 • आजचे पंतप्रधान परदेशात जाऊन पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी ना शिव्या घालतात हे देश हिताचे नाही.

 • देशात दबावाचे राजकारण सुरू आहे, मुघल, इंग्रज, यांची सत्ता देशाने उलथवली आहे.

 • सीबीआय, न्यायालय, रिझर्व्ह बँक यांच्यावर पंतप्रधानाकडून आघात होत असेल तर देश कसा टिकणार?

 • नोटबंदीने सर्वसामान्य उध्वस्त झाला, अर्थव्यवस्था उध्वस्त झाली, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतकरी व्यवसाय उध्वस्त झाला.

 • मोदींचा देशाने प्रधानमंत्री म्हणून सन्मान केला, सन्मानाला पात्र नाही म्हणून टीका झाली तर ते म्हणतात चहा वाल्याला संपवायला निघालेत. कोण संपवायला निघाले नाही, जनताच बाजूला करणार आहे.

 • मोदींना भाजपने पर्याय म्हणून पुढे केले असेल पण देशाला पर्याय ते ठरू शकत नाहीत.

 • 10 टक्के सवर्णांना आरक्षण निर्णय घेतलाय. यात स्पर्धा परीक्षा होणार आहे. पास होणाराच पात्र होणार आहे, फसवी घोषणा आहे. हा ही एक चुनावी जुमला आहे.

 • तरुणांना ही फसवण्यात आले आहे, मात्र ही तरुण पिढी पेटून उठली तर देश पेटून उठेल. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणा सुरू आहेत

 • पीक विमा योजना आहे ती शेतकऱ्यांना परतावा देत नाही, उलट विमा कंपन्या मोठा नफा कमवित आहेत, शासन त्यांच्यासाठी काम करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...