News18 Lokmat

अमोल कोल्हे यांच्या जातीच्या चर्चांवर असे बरसले अजित पवार

अजित पवार यांनी या सभेमध्ये थेट उपस्थितांना इच्छुक उमेदवारांची नावे सांगत तुमचा उमेदवार कोण असेल असं तुम्हीच ठरवा असं विचारलं.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 09:07 PM IST

अमोल कोल्हे यांच्या जातीच्या चर्चांवर असे बरसले अजित पवार

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

पुणे, 07 मार्च : काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात मागील 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आधळराव यांनी अमोल कोल्हे यांच्या जातीबद्दल विधान केलं होतं. त्यावर अजित पवार चांगलेच बरसले आहेत. अजित पवार यांनी या सभेमध्ये थेट उपस्थितांना इच्छुक उमेदवारांची नावे सांगत तुमचा उमेदवार कोण असेल असं तुम्हीच ठरवा असं विचारलं. यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांना जनतेने हात उंचावून पसंती दिली. त्यामुळे कोणाची जात विचारू नका तर त्या उमेदवाराला जनतेनं आधीच पसंत केलं असल्याचं पवार म्हणाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत आहेत. गुरुवारी मंचर आणि शिरुरला सभा झाल्या. या सभांमध्ये अजित पवार खूपच आक्रमक पाहायला मिळाले.


दरम्यान युती सरकारवरही आणि उद्धव ठाकरे यांनाही अजित पवार यांनी टीकेचं लक्ष केलं. मोदी सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला यांचे पुरावे थेट जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा आणि फ्लावरच्या पट्याच उपस्थितांना दाखवला असा टोला पवारांनी शिवसेनेला लगावला.

Loading...

मोदी सरकार खोट्या जाहिराती करून सरकारची  प्रतिमा मोठी करत आहे आणि तुमच्या-आमच्या खिशातील लाखो रुपयांचा चुराडा करत आहे हे सांगताना अजित पवारांनी थेट दैनिकांत छापून आलेल्या जाहिरातीही यावेळी दाखवल्या.

या संवाद यात्रेमध्ये बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट येथील शेतक-यांच्या  जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. बैलगाडा सुरू करायचा तर त्यावेळी सांगितलं. वर सरकार होतं पण तेव्हा आपण काही करू शकलो नाही. मात्र राज्यात आणि केंद्रात तुम्हीच आहे मग बैलगाडा का सुरू होत नाही असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

एकंदरीत शिरुर लोकसभा मतदार संघात सेना-राष्ट्रवादीत चांगलंच राजकारण तापताना दिसतं आहे. पण याचा अखरे निवडणुकांच्या निकालावेळी काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे - अमोल कोल्हे

दरम्यान, अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केल्यानंतर ते जुन्नरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना 'माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात आहे 'छत्रपतींचा मावळा' असं अमोल कोल्हे म्हणाले. 'राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहे. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,' असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं. त्यावर मी छत्रपतींचा मावळा असल्याचा टोला अमोल कोल्हा यांनी लगावला होता.

या भाषणावेळी अमोल कोल्हे यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. तर 'माझ्या संभाजी आणि शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतील फोटो कोणत्याही बॅनरवर वापरू नका' असा सल्लाही यावेळी अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला.


 VIDEO : मनसेचं इंजिन आघाडीत? अशोक चव्हाण म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...