गडचिरोलीत नक्षलवाद्यांची हिंसा सुरूच; आणखी एका नागरिकाची निर्घृण हत्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची हिंसा सुरूच; आणखी एका नागरिकाची निर्घृण हत्या

नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशयावरून आणखी एका नागरिकाची हत्या केली आहे.

  • Share this:

गडचिरोली, 06 मे : नक्षलवादी हल्ले थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. जवानांच्या ताफ्यांना लक्ष्य केल्यानंतर नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा आता स्थानिकांकडे वळवला आहे. गडचिरोलीतील एका नागरिकाची गावामध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. सुधीर सरकार असं या व्यक्तिचं नाव आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली. दरम्यान, मागील 24 तासातील ही दुसरी हत्या आहे. यापूर्वी देखील पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून एकाची हत्या करण्यात आली होती. स्थानिकांना यापूर्वी देखील नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलेलं आहे. वाढता नक्षलवाद पाहता आणि पोलिसांनी देखील त्याविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.लग्नाला जाताना काळाचा घाला; 5 जणांचा जागीच मृत्यू

भामरागडमध्ये देखील हत्या

भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका व्यक्तीची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. मागील सहा दिवसांत ही तिसरी घटना आहे. पोलीसांचा खबऱ्या असल्याचा संशयावरून नक्षलवाद्यांनी या व्यक्तीची हत्या केली. डोंगा कोमटी वेडदा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नैनवाडी येथील रहिवासी होता. डोंगा कोमटी वेडदा लग्नसमारंभासाठी मर्दहूर येथे आला होता. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली.

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून नक्षलवादी हिंसक कारवाया करत आहेत. पोलिस विभाग नक्षलविरोधी अभियान राबवित आहे. असे असतानाही महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे रस्ता कामावरील वाहनांना पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर जांभुळखेडा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवून आणला. यात 15 पोलिस जवान शहीद झाले होते. तसेच खासगी वाहनचालक ठार झाला होता. या घटनांमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नक्षलवादविरोधी मोहिम देखील आता आणखी कठोर करण्यात आली आहे.


VIDEO: पाण्यासाठी संघर्ष, पाण्याच्या शोधात सिंह पोहोचला गावात अन्...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 11:03 AM IST

ताज्या बातम्या