S M L

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद, 21 जखमी

माओवाद्यांनी भुसुरूंगाचा स्फोट घडवला, ज्यात एकूण 12 जवान जखमी झाले. त्यातील सुरेश तेलामी हा जवान उपाचारा दरम्यान शहीद झाला आहे.

Samruddha Bhambure | Updated On: May 4, 2017 11:14 AM IST

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद, 21 जखमी

04 मे : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात काल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून 21 जवान जखमी झालेत.

भामरागड तालुक्यात कोपरसीच्या जंगलात काल दुपारी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात तीन जवान जखमी झाले होते. त्या जखमी जवानांना रायपूरमधे हेलीकॉप्टरच्या मदतीनं पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू होती. 360 कंमांडोंच्या पथकाचे जवान दोन भूसुरुंगविरोधी वाहनात बसून भामरागडकडे निघाले होते. मात्र हेमलकसाजवळील कियर गावाजवळ माओवाद्यांच्या हल्ल्यात ते फसले. माओवाद्यांनी भुसुरूंगाचा स्फोट घडवला, ज्यात एकूण 22 जवान जखमी झाले. त्यातील सी-60 कमांडोंचे सुरेश तेलामी यांचा उपाचारा दरम्यान शहीद झाला आहे. उर्वरीत 21 जवानांवर भामरागडमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, 5 जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं असून या परिसरात अजूनही कोंम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

याआधी बुधवारी सकाळी भामरागड उपविभागातील कोपर्शी व पुलनार जंगल परिसरात विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांसमवेत उडालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान व दोन पोलीस किरकोळ जखमी झाले होते. तर 24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 25 जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 09:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close