VIDEO : नवनीत राणांची सेना खासदार अडसूळ यांच्याविरोधात कोर्टात धाव

VIDEO : नवनीत राणांची सेना खासदार अडसूळ यांच्याविरोधात कोर्टात धाव

आता जिल्हा न्यायालय या प्रकरणाचा काय निकाल देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 08 जानेवारी : अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. राणा यांनी अडसूळ यांच्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. लवकरच या प्रकरणाचा अंतिम निकाल दिला जाणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांचा दरम्यान वाद झाला होता.

या वादानंतर नवनीत कौर राणा यांनी अडसूळ यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. मात्र, प्रकरण निकाली काढताना तक्रारदार नवनीत राणा यांना कळवण्यात आलं नव्हतं. अडसूळ यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप नवणीत राणा यांनी केला आहे.

त्यामुळेच त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाची आज मंगळवारी अंतिम सुनावणी झाली आहे. आता जिल्हा न्यायालय या प्रकरणाचा काय निकाल देते,याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या