PHOTOS : 'काय पो छे' नवनीत राणांची तुफान पतंगबाजी

अमरावती येथे आज लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी 'काय पो छे' म्हणत जोरदार पतंगबाजी केली. (संजय शेंडे, प्रतिनिधी)

 • Share this:

 अमरावती येथे आज लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी 'काय पो छे' म्हणत जोरदार पतंगबाजी केली.

 अमरावतीतील बडनेरा अमरावती मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने गेल्या 4 दिवसांपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

  आज या महोत्सवात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवात लहान मुलांना पंतग वाटप करण्यात आले होते.

Loading...

 यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पतंग उडवून महोत्सवाला सुरूवात केली.

  नुकतेच मेळघाटातील मुन्ना शेलुकर हे तवांग येथे शहीद झाले. त्यांच्या नावाने सुद्धा पतंग उडवून श्रद्धांजली देण्यात आली.

 यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचा मोठा पतंग उडवून लहान मुलांनी आनंद घेतला.

 आपण सतत जनतेच्या समस्यांसाठी काम करत असून, केवळ निवडणूक आली म्हणून काही लोकं सारखं बाहेर निघत नाही, असा टोला नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांचे नाव न घे लगावला.

  गेल्या लोकसभा निवडणुकीत मी पराभूत झाले, तरी सतत जनतेच्या संपर्कात होते. त्यामुळे आपली निवडणुकीची पूर्ण तयारी झाली, असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं.

या पतंग महोत्सवाला शहरातील लहान आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

तसंच युवा स्वाभिमान पक्षाकडून मकर संक्रांत निमित्ताने महिला मेळावा आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

 या कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांनी हजेरी लावली होती.

 या मेळाव्यात नवनीत राणा यांनी, 'आपली लढाई ही महिलांच्या स्वाभिमानाची आहे. दिल्लीच्या लोकसभेत मी, नव्हे तर या गोरगरीब महिला पोहोचणार', असल्याचं सांगितलं.

  कार्यक्रमात नवनीत राणा यांनी महिलांना हळदी कुंकू लावून वाणाचे वाटप केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...