नवी मुंबई, 29 जुलै: नवी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 57 नगरसेवकांची बैठक होणार आहे. महापौर जयवंत सुतार यांनी ही बैठक बोलावली असून महापौर बंगल्यावर दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. आणि एकत्रित निर्णय घेऊन गणेश नाईकांवर दबाव टाकला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.