नवी मुंबई महापालिकेची हॉस्पिटल्स 'ऑक्सिजन'वर, डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे हाल

नवी मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची तब्बल 286 पदं भरणं बाकी आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 09:52 PM IST

नवी मुंबई महापालिकेची हॉस्पिटल्स 'ऑक्सिजन'वर, डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे हाल

विनय म्हात्रे, नवी मुंबई 29 मे :  नवी मुंबई महानगरपालिके कडून करोडो रूपये खर्च करून शहरात अनेक ठिकाणी रूग्णालये उभारण्यात आली आहे. त्यात लाखो रुपयांची मशिन्सही बसविण्यात आली आहेत. मात्र या रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयाची ही परिस्थिती तातडीने दूर करा अशी मागणी होत आहे.

ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ , सीबीडी येथे अत्याधुनिक मशनरी सहीत उभी असलेली रूग्णालये फक्त शो चा विषय झाली आहेत. यांचं मुख्य कारण म्हणजे या रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टरच नाहीत. रुग्णांची संख्या आणि त्यांच्यासाठी असलेले डॉक्टर यांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे. त्यामुळे नुसत्या इमारतींचं करायचं काय असा सवाल विचारण्यात येतोय.

शहराची लोकसख्या 12 लाखापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणं रुग्णांची संख्याही वाढते आहे. आधुनिक शहर आणि श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या नवी मुंबई महापालिकेची स्थिती वाईट असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची तब्बल 286 पदं भरणं बाकी आहे. ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी मागणी आमदार संदिप नाईक यांनी केलीय.

ही पदं भरण्यासाठी नगविकास खात्याची मंजूरी आवश्यक असते. हे खातं मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांना भेटून ही मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...