राष्ट्रवादी करणार पलटवार, नवी मुंबईतील खेळी भाजपवरच उलटवण्यासाठी नेते मैदानात

राष्ट्रवादी करणार पलटवार, नवी मुंबईतील खेळी भाजपवरच उलटवण्यासाठी नेते मैदानात

नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 30 जुलै : नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.

नवी मुंबईत नाईक कुटुंबासह राष्ट्रवादीचे इतर नगरसेवकही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नगरसेवकांना रोखण्यसाठी ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत, अशी माहिती आहे. 8 ते 10 नगरसेवक राष्ट्रवादी सोडणार नसल्याची माहिती समोर येत आहे. रात्रभरात इतर पक्षाच्या नेत्यांना ठाण्यातून संपर्क करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने आपली सर्व शक्ती पणाला लावल्याचं दिसत आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व 57 नगरसेवक हातावरचं घड्याळ सोडून हातात 'कमळ' घेणार असल्याची चर्चा काल रंगत होती. या नगरसेवकांनी भाजप प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडू शकतं. नवी मुंबई हा राष्ट्रवादीला गड समजला जातो आणि तिथेच मोठं खिंडार पडल्याने पक्षाला हा मोठा हादरा मानला जात आहे.

भाजपच्या खेळीला राष्ट्रवादी कसं देणार उत्तर?

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

पिवळ्या साडीतील महिला कर्मचारी थिरकली 'टिप टिप बरसा पाणी..'वर, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 11:09 AM IST

ताज्या बातम्या