S M L

बँक कर्मचारी संपावर गेले तरी नोकरदारांचे पगार वेळेतच होणार, विश्वास उटगींचा दावा

बँक कर्मचारी संपावर गेले तरी नोकरांदारांचे पगार वेळेतच जमा होतील असा दावा विश्वास उटगी यांनी केला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 30, 2018 12:03 PM IST

बँक कर्मचारी संपावर गेले तरी नोकरदारांचे पगार वेळेतच होणार, विश्वास उटगींचा दावा

मुंबई, ता. 30 मे : आजपासून राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर जाणार आहेत. संपासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी महिनाअखेरचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळं या महिन्याचा पगार तर लांबणीवर पडणार नाही ना अशी शंकचे पाल चाकरमान्यांच्या मनात चुकचुकत होती. पण बँक कर्मचारी संपावर गेले तरी नोकरांदारांचे पगार वेळेतच जमा होतील असा दावा विश्वास उटगी यांनी केला आहे.

या संपामुळे एटीएममध्येही खडखडाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. राष्ट्रीयकृत बँकांच्या वेगवेगळ्या 9 कर्मचारी संघटनांचे 10 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर आणि आर्थिक व्यवहारावर पहायला मिळणार आहे.

इंडियन बँक असोसिएशनने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मागच्या वेळी बँक कर्मचाऱ्यांना जवळपास १५ टक्के पगारवाढ देण्यात आली होती. केंद्रीय कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करत संप होऊ नये यासाठी खटाटोप केला खरा, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

दरम्यान, आयबीएकडून माफक २ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य नसल्याने देशभरातील सरकारी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं १६ मेपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातल्या सरकारी बँकांच्या ५५०० हजार शाखांमधील ३२ हजारहून अधिक कर्मचारी आणि ८,००० आणि अधिकारी या संपात सहभागी होतील. नऊ प्रमुख युनियनच्या युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनने (यूएफबीयू) या संपाची हाक दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2018 08:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close